तुला पाहण्याची मला आज चोरी म्हणुन राहिले मी उभी पाठमोरी
तुझी सय तुझा छंद .. आनंद माझा जणू तूच माझ्या सुखाची तिजोरी
मला चारचौघात म्हणतो जवळ ये सख्या काय भलती तुझी ही मुजोरी! जरा श्वास श्वासात मिसळून घेऊ फुलेही उमलतील ओठी टपोरी तुझा चांदवा फक्त मजलाच दे तू जरी चांदण्या भोवताली पिठोरी मिळूनी जरा या क्षणांना जपूया उद्या सोबतीला असावी शिदोरी - प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा