मंगळवार, ३० डिसेंबर, २०१४

पावसाळा क्रूर होता

पावसाळा क्रूर होता
पण मला मंजूर होता

सौख्य दाराशी उभे पण
चेहरा भेसूर होता

भिंत ही लेकूरवाळी
वाढला अंकूर होता


ऐनवेळी लागलेला
सूर का बेसूर होता?


जन्म अवघा माउलीचा
कोंडले काहूर होता!


चार भिंतीआड दहशत
अन म्हणे तो शूर होता


कोरड्या मातीवरी या
आसवांचा पूर होता


मांडली का ही गझल मी
कोणता हा नूर होता??


चंद्र माझ्या मालकीचा
फ़क्त थोडा दूर होता
-प्राजु

1 प्रतिसाद:

Vijay Shendge म्हणाले...

खुप अप्रतिम प्राजूजी.

Page copy protected against web site content infringement by Copyscape