तू ऊन शिंपडूनी माझ्यावरी जरासे
तू ऊन शिंपडूनी माझ्यावरी जरासे
या गोठल्या क्षणांना देशील का दिलासे?
बोलू नकोस काही, बघ एकदा वळूनी
नजरेत वागण्याचे मिळतीलही खुलासे
या गोठल्या क्षणांना देशील का दिलासे?
बोलू नकोस काही, बघ एकदा वळूनी
नजरेत वागण्याचे मिळतीलही खुलासे
नाण्यास दोन बाजू असतात नेहमी हो
खंड्या/पक्षी कितीही सुंदर , पण मारतोच मासे
खंड्या/पक्षी कितीही सुंदर , पण मारतोच मासे
जातेच सावलीही , काळोख दाटल्यावर
पैसा नि नाव जाता होती फितूर वासे
पैसा नि नाव जाता होती फितूर वासे
मी लावले स्वत:ला डावावरी नव्याने
हारेन मी स्वत:हुन तू फक्त फेक फासे
हारेन मी स्वत:हुन तू फक्त फेक फासे
मी त्याच त्या क्षणांना स्मरते सदैव आता
कारण तुझे तुझेपण मज अंतरात भासे
-प्राजू
कारण तुझे तुझेपण मज अंतरात भासे
-प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा