येतात विचारच भिन्न,
येतात विचारच भिन्न, मनाशी खिन्न,
जुन्या स्वप्नांचे
उठवीत खळे वादळी मनाच्या जळी
खडे प्रश्नांचे
जुन्या स्वप्नांचे
उठवीत खळे वादळी मनाच्या जळी
खडे प्रश्नांचे
कोठुनी कळेना कोण प्रीतिचा द्रोण
घेऊनी हाती
मज म्हणे चाल तू संग होऊनी दंग
सोड रितभाती
घेऊनी हाती
मज म्हणे चाल तू संग होऊनी दंग
सोड रितभाती
अलवार उडाली धूळ मनाचे मूळ
दिसाया लागे
फुटतात नवे अंकूर गवसतो सूर
फुलाया लागे
दिसाया लागे
फुटतात नवे अंकूर गवसतो सूर
फुलाया लागे
येतात किती कल्पना माझिया मना
कोवळ्या ढंगी
हातात घेतला हात खोल डोळ्यात
स्वप्न सतरंगी
कोवळ्या ढंगी
हातात घेतला हात खोल डोळ्यात
स्वप्न सतरंगी
नजरेस फुटावा कंठ नसावा अंत
मौन ही भाषा
बोलते कुणी सौंधात, खोल हृदयात
खुळी अभिलाषा
मौन ही भाषा
बोलते कुणी सौंधात, खोल हृदयात
खुळी अभिलाषा
कोणता नसावा बंध , क्षणांना गंध
नव्या नात्याचा
आयुष्य दिसावे फूल पडावी भूल
विसर सत्त्याचा
नव्या नात्याचा
आयुष्य दिसावे फूल पडावी भूल
विसर सत्त्याचा
-प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा