सोमवार, ७ फेब्रुवारी, २०११

फ़सव्या होत्या वाटा..

फ़सव्या होत्या वाटा सार्‍या
नको वळूनी पाहू पुन्हा
भुललासी तू मोहाला त्या
हाच होता तुझा गुन्हा

आश्वासनांचे डोंगरे सारे
मनांत कपटी वारे होते
दिसता हिरवळ पैलतटावर
भिरभिर फ़िरले तारे होते

पोकळ वचने, फ़सवी स्वप्ने
सत्य मात्र भकास होते
शब्द बुडबुडे उथळपणाचे
गोड, लाघवी, झकास होते!!

भुलू नको तू पुन्हा आता रे
आंतरमनाला साद दे
फ़सव्या वळणावरती पुन्हा
सत्याला तू हाक दे

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape