थांबणे सोसेल तोवर लागते चालायला..
वणवणूनी गीत माझे लागले सांगायला
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला
दाटले डोळ्यांत आसू की निखारा तप्तसा
सांडताना लागले ते पापण्या जाळायला
प्रीत होती, ध्यास होता, अन तुझा आभासही
तप्त काया लागली तव स्पर्श रे मागायला..
आठवूनी चित्र सारे जीवना द्यावी मिती
लागते ऐसी शिदोरी खूप सांभाळायला
मी म्हणोनी सांगणारा सूर्य होता तापला
दाह त्याचा आज त्याला लागला पोळायला
प्रीतिच्या रंगात या मी हाय ऐसी रंगले
लागल्या त्या पाकळ्या मज रंग ते मागायला
सूर छेडी गूढ वारा, सांज होता अंगणी
दु:ख माझे लागले ओठावरी रंगायला
- प्राजु
1 प्रतिसाद:
प्रीत होती, ध्यास होता, अन तुझा आभासही
तप्त काया लागली तव स्पर्श रे मागायला..
प्रीतिच्या रंगात या मी हाय ऐसी रंगले
लागल्या त्या पाकळ्या मज रंग ते मागायला
सूर छेडी गूढ वारा, सांज होता अंगणी
दु:ख माझे लागले ओठावरी रंगायला
खूप खूप छान !
टिप्पणी पोस्ट करा