शांत राहू नको सांग तू
शांत राहू नको सांग तू
पाहिजे तर जरा भांड तू
पाहिजे तर जरा भांड तू
मी दिवस रूक्ष कंटाळला
शांत अन् सोवळी सांज तू
शांत अन् सोवळी सांज तू
मी व्यथांचीच गर्दी जुनी
अन सुखाची नवी रांग तू
अन सुखाची नवी रांग तू
उत्तरे जर हवी नेमकी
प्रश्नही नेमका मांड तू
प्रश्नही नेमका मांड तू
सूर भजनातला तीव्र मी
साधते सम अशी झांज तू
साधते सम अशी झांज तू
भव्य अंगण मनाचे खुले
हो बकुळ ! ये जरा .. सांड तू
हो बकुळ ! ये जरा .. सांड तू
स्वैर मोकाट माझ्या मना
दावणीला तुझ्या बांध तू
दावणीला तुझ्या बांध तू
राहिले यायचे कैकदा
आज येईन मी थांब तू
आज येईन मी थांब तू
- प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा