भारत भूमीच्या नावाचा गर्जतसे ॐकार
जगात सार्या एक मुखाने करूया जयजयकार
भारत भूमीच्या नावाचा गर्जतसे ॐकार
भारत भूमीच्या नावाचा गर्जतसे ॐकार
शेती पिकवे माती काळी , पक्षी उडती उंच आभाळी
फुले नि पाने देऊन टाळी, हिरवळ झुळझुळ नवी नव्हाळी
गंगा जमुनांचे छातीवर , मिरवीत सुंदर हार..
भारत भूमीच्या नावाचा गर्जतसे ॐकार ..
फुले नि पाने देऊन टाळी, हिरवळ झुळझुळ नवी नव्हाळी
गंगा जमुनांचे छातीवर , मिरवीत सुंदर हार..
भारत भूमीच्या नावाचा गर्जतसे ॐकार ..
इतिहासाची मशाल हाती.. लावून विज्ञानाच्या ज्योति
अवकाशी त्या घेऊ भरारी.. बदलून टाकू दुनिया सारी..
स्वप्ना आमुच्या भारत- भू चे करुनिया साकार
भारत भूमीच्या नावाचा गर्जतसे ॐकार ..
-प्राजू
अवकाशी त्या घेऊ भरारी.. बदलून टाकू दुनिया सारी..
स्वप्ना आमुच्या भारत- भू चे करुनिया साकार
भारत भूमीच्या नावाचा गर्जतसे ॐकार ..
-प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा