शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

विटाळ होतो स्त्रीत्वाचा

विटाळ होतो स्त्रीत्वाचा हो ज्या देवाला
स्वत:च त्याने घालावे मग मुल जन्माला
अभिषेकाची धार तुझ्यावर दगड तरी ‘तू’ !
शिंतोड्यांनी फुटे पालवी भिंताडाला ..
मनी कुणाच्या नकोच आता जागा मजला
मीच शोधले आहे माझ्या अढळ ध्रुवाला
अहंकार अन मत्सर म्हणजे तुझे सोयरे
किती त-हेने सजवतात अपुल्या नात्याला
वेशीवरती धरे, तुझी लक्तरे टांगतो नको भुलू तू पाउस म्हणणा-या पुरुषाला
जहाल काही लिहून जाशिल आणिक ‘प्राजू’
धर्मांधांची फौजच येईल बघ मोर्चाला
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape