इतका कसा दुरावा
इतका कसा दुरावा, इतके कशास अंतर
रुसलास ना प्रिया तू, प्रेमात छेडल्यावर??
रुसलास ना प्रिया तू, प्रेमात छेडल्यावर??
पाऊस होउनी तो, घेतो कवेत मजला
मी विरघळून जाता, म्हणतो मलाच साखर
मी विरघळून जाता, म्हणतो मलाच साखर
हृदयात ठेवलेले चोरीस हाय गेले!
कोणी कधी नि केव्हा माझ्याकडे न उत्तर!
कोणी कधी नि केव्हा माझ्याकडे न उत्तर!
येता बहर वयाला आले फुलून सारे
देहावरी नव्याने तू शिंपलेस अत्तर
देहावरी नव्याने तू शिंपलेस अत्तर
पाऊस यौवनाचा होता भरात तरिही
होते किती समंजस अपुल्या मधील अंतर
होते किती समंजस अपुल्या मधील अंतर
नाही कुठेच जागा ना कोपरा रिकामा
हृदयी अखंड माझ्या आहे तुझाच वावर
हृदयी अखंड माझ्या आहे तुझाच वावर
गाणे नवे तराणे आता मला सुचेना
माझ्या मनी अताशा चाले तुझाच जागर
माझ्या मनी अताशा चाले तुझाच जागर
गेलास बोलुनी की, "दिसतेस छान" मजला
निरखीत राहिले मी, ऐन्यामध्ये खरोखर
निरखीत राहिले मी, ऐन्यामध्ये खरोखर
- प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा