उथळ पाण्यामध्ये सुद्धा
उथळ पाण्यामध्ये सुद्धा अशा बुडतात का नावा?
तरंगत काठ गाठावा असा येतो न सांगावा
तरंगत काठ गाठावा असा येतो न सांगावा
विकेटच टाकुनी अर्ध्यात तो गेला मला सोडुन
करू मी एकटी बॅटींग अन काढू किती धावा?
करू मी एकटी बॅटींग अन काढू किती धावा?
सयींचा घेतला धसका मनाने काय सांगू मी!
किती ते भरकटुन जाते, जणू चकवाच लागावा
किती ते भरकटुन जाते, जणू चकवाच लागावा
तुझ्या हृदयातल्या गावातुनी मी पायपिट केली
मिळाले सर्वकाही तेथ पण नव्हताच ओलावा
मिळाले सर्वकाही तेथ पण नव्हताच ओलावा
कितीदा सोडले त्याला तरी येतोच माघारी
अशा माझ्यातल्या या 'मी'स कोठे दूर धाडावा?
अशा माझ्यातल्या या 'मी'स कोठे दूर धाडावा?
तुला बरसायचे नाही , नको आशेसही लावू
फुका दाटून येण्याचा अती झालाय कांगावा
फुका दाटून येण्याचा अती झालाय कांगावा
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा