म्हणे वेगळा खेळ त्याला हवा
म्हणे वेगळा खेळ त्याला हवा
बहाणा नवा भांडण्याला हवा
बहाणा नवा भांडण्याला हवा
नको सर्व इच्छा करू पूर्ण 'तू'
बहाणा पुन्हा जन्मण्याला हवा
बहाणा पुन्हा जन्मण्याला हवा
नयन, ओठ ओले खळीची नशा
तरी सांग हातात प्याला हवा?
तरी सांग हातात प्याला हवा?
किती तेच ते लावले .. काढले
मुखवटा नवा चेह-याला हवा
मुखवटा नवा चेह-याला हवा
ऋतूंची नको आढ्यता सारखी
तुझा स्पर्श माझ्या मळ्याला हवा
तुझा स्पर्श माझ्या मळ्याला हवा
जसा आज होता तुझ्या संगती
तसा रंग माझ्या उद्याला हवा
तसा रंग माझ्या उद्याला हवा
'दिसावास तू पाहता मी' असा
नियम नेहमी आरश्याला हवा
नियम नेहमी आरश्याला हवा
- प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा