शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

दुनियेमध्ये कुठली वस्तू असे रिकामी?

दुनियेमध्ये कुठली वस्तू असे रिकामी?
सुंठ घासण्या खापर सुद्धा ठरते नामी
मी नसताना मी असल्याचा भास निर्मिते
जणू वेदना आहे माझी जुळी सयामी
खडा नको तू मारू माझ्या दु:खावरती
तरंग सुद्धा होती नकळत म्हणे सुनामी
'छान तिथे राहू दे त्यांना, आनंदाने'
"वृद्धाश्रम" हा फॅशन म्हणतात पुरोगामी ?!
शत्रूशीही मित्रागत मी वागुन गेले
विस्मरणांना उभ्या उभ्या द्यावीच सलामी
कथा कल्पना कविता गजला सारे आहे
तरी डायरी आयुष्याची कशी रिकामी ?
उगाच येता! आणिक उलथापालथ होते
मला स्मृतींनो नकोच तुमची अशी गुलामी
-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape