प्रश्नांचे का उठते वादळ
प्रश्नांचे का उठते वादळ तुला पाहुनी
ढवळुन निघतो हृदयाचा तळ तुला पाहुनी
ढवळुन निघतो हृदयाचा तळ तुला पाहुनी
इवली जिवणी, ताठ नाक अन ओठ चिमुकले
विसरुन गेले प्रसुतीची कळ , तुला पाहुनी
विसरुन गेले प्रसुतीची कळ , तुला पाहुनी
घेउन ये धारांना सोबत ढगा जरासा
मनी धरेच्या फुलेल हिरवळ, तुला पाहुनी
मनी धरेच्या फुलेल हिरवळ, तुला पाहुनी
सुस्त पहुडल्या मनातल्या या रस्त्यावरती
पुन्हा सयींची झाली वर्दळ , तुला पाहुनी
पुन्हा सयींची झाली वर्दळ , तुला पाहुनी
रखरखलेल्या दिवसानंतर, चैतन्याने
सांजेची बघ भरते ओंजळ तुला पाहुनी
सांजेची बघ भरते ओंजळ तुला पाहुनी
मळवट भाळी, त्रिशूळ हाती, माय भवानी
मनात घुमते अखंड संबळ , तुला पाहुनी
मनात घुमते अखंड संबळ , तुला पाहुनी
वसंत नाही तरी पोपटी पालवते मी
होउन सळसळणारा पिंपळ, तुला पाहुनी
होउन सळसळणारा पिंपळ, तुला पाहुनी
पडले झडले कितीक वेळा आई, तरीही
पुन्हा लढाया मिळते मज बळ, तुला पाहुनी
पुन्हा लढाया मिळते मज बळ, तुला पाहुनी
-प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा