शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

सयी अचानक येती दौडत

सयी अचानक येती दौडत
हल्ला करती नेमस्तागत
डुहुळुन टाके शांत डोह हा
खडा एकला तरंग उठवत
“लगेच मजला निघाया हवे”
नको वसंता येऊ सांगत
अंधाराशी इतकी सलगी??
उजेडात घर नाही बघवत ..
लाज तुला ना ढगा कशाची
गर्जुन पोकळ नाही भागत
प्रेम कुणावर किती करावे??
पाठ कुणी का नाही पढवत?
समोर तू अन मूकच वाणी
नजरेची मग नसते धडगत .. !
नको मना तू करूस दंगा
बैस सयींचे मोती ओवत
-प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape