स्वप्ना तुझे रूपांतर
तरही गजल
स्वप्ना तुझे रूपांतर सत्यात होत आहे..
नुकतीच श्रावणाला सुरुवात होत आहे
स्वप्ना तुझे रूपांतर सत्यात होत आहे..
नुकतीच श्रावणाला सुरुवात होत आहे
आलीत पैंजणांचा घेऊन नाद स्मरणे
हळवा निनाद त्याचा श्वासात होत आहे..
हळवा निनाद त्याचा श्वासात होत आहे..
मी आवरीत आहे कित्येकदा परंतू
अनिवार हा पसारा हृदयात होत आहे..
अनिवार हा पसारा हृदयात होत आहे..
‘संवाद रोज व्हावा’ होतात वाद यावर
परिणाम शेवटी मग मौनात होत आहे..
परिणाम शेवटी मग मौनात होत आहे..
सुरवंट या मनाचा आहे कुरूप सध्या
फुलपाखरू तयाचे कोषात होत आहे
फुलपाखरू तयाचे कोषात होत आहे
बिघडेल फारसे ना तुमच्यामुळे सयींनो
मी वार झेलण्याला निष्णात होत आहे
मी वार झेलण्याला निष्णात होत आहे
आरोप, दोष सारे झाले करून आता
माझी जरा मनाशी रुजवात होत आहे
माझी जरा मनाशी रुजवात होत आहे
परतून पाखरांनो वेळेत जा तुम्हीही
सरला उजेड आता अन् रात होत आहे
- प्राजू
सरला उजेड आता अन् रात होत आहे
- प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा