असे चांदव्याला पिसे सागराचे
असे चांदव्याला पिसे सागराचे
की लाटांवरी तो प्रकाशून नाचे
पुन्हा प्रीत त्याची उधाणून येता
पसारे किनार्यावरी त्या क्षणांचे
लपेटून गंधित सुवासीक शेला
हळूवार वारा खुळावून गेला
कधी मंद होताच बेबंध होतो
घुमू लागतो आणि भलत्या दिशेला
अशी रात येते युगातून सखया
फुलवते खुलवते हळूवार हृदया
मिळावे तुला जे हवे तेच अलगद
जडावी मनावर मनाचीच किमया
- प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा