की मृगजळाचेही आभास ??..
या गहि-या डोहावरती , कसलेसे तरंग उमटती
प्रतिबिंबाचा चुकतो ठोका , ते विसरुन जाते मीती
प्रतिबिंबाचा चुकतो ठोका , ते विसरुन जाते मीती
झंकारत येतो वारा , लहरींच्या छेडीत तारा
किरणांचे बाण घुसूनी , पाण्याचा उडतो पारा
किरणांचे बाण घुसूनी , पाण्याचा उडतो पारा
वा-यावर हलके मंद , झुलतात उन्हाचे स्पंद
अन खोल दरी लंघूनी , मरव्याचा विहरे गंध
अन खोल दरी लंघूनी , मरव्याचा विहरे गंध
त्या ओल्या हिरवाईवर , आकाश जरासे पांघर
घे पापण्यात गुंफुन, स्मरणांच्या मोत्यांची सर
घे पापण्यात गुंफुन, स्मरणांच्या मोत्यांची सर
ही युगायुगांची आस.. की जन्मान्तरीचा ध्यास ??
प्रचिती अद्वैताची .. की मृगजळाचेही आभास ??
- प्राजू
प्रचिती अद्वैताची .. की मृगजळाचेही आभास ??
- प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा