पास तू येऊ नको मी पेटता आहे निखारा..
पास तू येऊ नको मी पेटता आहे निखारा
फ़ूल वा नाही कळी... मी धूर राखेचा पिसारा
तू नको पाण्यावरी मारूस रेघोट्या उगाचच
शोध लिहिण्या नाव माझे एक वाळूचा किनारा
ना मुभा मातीस या बहरायची हासायचीही
देत हा दुष्काळ आहे पावसावरती पहारा
'तू नको देऊस इच्छा, आस, आकांक्षा मनाला'
हेच मी मागीतले बघुनी निखळता एक तारा
पावला खाली तुडवला जो दगड वर्षानुवर्षे
फ़ासला शेंदूर त्याला, वाढला त्याचा दरारा
स्वार होऊनी निघाले मी सुगांधावर जराशी
दाबुनी कळ हाय देवा! बंद तू केलास वारा!!
- प्राजु
ना मुभा मातीस या बहरायची हासायचीही
देत हा दुष्काळ आहे पावसावरती पहारा
'तू नको देऊस इच्छा, आस, आकांक्षा मनाला'
हेच मी मागीतले बघुनी निखळता एक तारा
पावला खाली तुडवला जो दगड वर्षानुवर्षे
फ़ासला शेंदूर त्याला, वाढला त्याचा दरारा
स्वार होऊनी निघाले मी सुगांधावर जराशी
दाबुनी कळ हाय देवा! बंद तू केलास वारा!!
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा