दूर दिसणार्या क्षितिजाशीच माझी हद्द आहे..
स्थीर अन खंबीर आहे, झुंजण्याला सिद्ध आहे
अंतरी माझ्या नव्याने जिंकण्याची जिद्द आहे
पंख माझे तोकडे आकाश आहे दूर तरिही
या मनाला भय न काही, ध्येय त्याचे शुद्ध आहे
ही सकरात्मक दिशा, आशा नि आकांक्षा हजारो
फ़ाटकी झोळी अचानक जाहली समृद्ध आहे
पानगळ सुद्धा किती अल्लड नि लोभस देखणीशी
का उगा पानास पिकलेल्या म्हणावे 'वृद्ध आहे?'
गलबला होतो मनी पाहून कोण्या दु:खितांना
सोडण्या संसार पण हा मी न कोणी बुद्ध आहे
वाट माझी वाकडीशी चालणे खडतर जरासे
दूर दिसणार्या क्षितिजाशीच माझी हद्द आहे..
-प्राजु

0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा