हे असे आभासवाणे चांदणे आता नको (तरही)
भाबड्या आशा उराशी बांधणे आता नको
हे असे आभासवाणे चांदणे आता नको
वेगळे जर व्हायचे होऊन जाऊ एकदा
निरनिराळ्या कारणांनी भांडणे आता नको
'कामही थोडे करा!' यांना कुणी सांगेल का
व्यर्थ पोकळ मोठमोठी भाषणे आता नको
यायचे तर ये असा की वाहु दे सार्या व्यथा
वाट पाहुन वाळणे.. भेगाळणे आता नको
भाकरीशी मीठ नाही.. कोरडी चालेल पण
मान झाडाला धन्याने टांगणे आता नको
तू हिरा आहेस नारी, तासती सारेच पण
स्वर्ण चांदीची सभोती कोंदणे आता नको..
-प्राजु
हे असे आभासवाणे चांदणे आता नको
वेगळे जर व्हायचे होऊन जाऊ एकदा
निरनिराळ्या कारणांनी भांडणे आता नको
'कामही थोडे करा!' यांना कुणी सांगेल का
व्यर्थ पोकळ मोठमोठी भाषणे आता नको
यायचे तर ये असा की वाहु दे सार्या व्यथा
वाट पाहुन वाळणे.. भेगाळणे आता नको
भाकरीशी मीठ नाही.. कोरडी चालेल पण
मान झाडाला धन्याने टांगणे आता नको
तू हिरा आहेस नारी, तासती सारेच पण
स्वर्ण चांदीची सभोती कोंदणे आता नको..
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा