वर आभाळ पेटले...
वर आभाळ पेटले, नाही ढगालाही थारा
चांदव्याच्या मदतीला, कुणी फिरकेना तारा
चांदव्याच्या मदतीला, कुणी फिरकेना तारा
वळ उठलेले किती, आभाळाच्या अंगभर
रवी दिसे उधाणला, परतीच्या वाटेवर
रवी दिसे उधाणला, परतीच्या वाटेवर
सांज उदास कलली, क्षितिजाच्या कडेवर
ओघळले अश्रू तिचे, डोंगराच्या माथ्यावर
ओघळले अश्रू तिचे, डोंगराच्या माथ्यावर
गोपुरात किणकिण, निनादतो घंटा रव
मन ओलावून जातो, दूर मारव्याचा स्वर
मन ओलावून जातो, दूर मारव्याचा स्वर
काळोखाच्या विळख्याचे, भय सांजेच्या मनात
कुणी पेटेल का दीप, आस वेडी स्पंदनात
कुणी पेटेल का दीप, आस वेडी स्पंदनात
हसे उगाच रुपेरी, जरी थरारे भीतीने
देई दिलासा मनास, चांदव्याच्या सोबतीने
-प्राज
देई दिलासा मनास, चांदव्याच्या सोबतीने
-प्राज
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा