मंगळवार, १२ जून, २०१२

पत्र लिही तू तेव्हा


सयी अनावर होतील माझ्या,पत्र लिही तू तेव्हा
नीज न येईल तुझ्या लोचनी, पत्र लिही तू तेव्हा

गर्द गहिर्‍या निळसर रानी हसणारा पाऊस
तृप्त कराया धरतीला मग झुरणारा पाऊस
रात्री छपरावरती अविरत झरणारा पाऊस
तप्त करुनी जाईल काळीज, पत्र लिही तू तेव्हा

वृक्षलतांच्या पानांमध्ये जेव्हा सळसळ होईल
कधी हळवा क्षण मग तुजला फ़ुलवुन जाईल
खुळी आठवण माझी जेव्हा तुजला वेढून घेईल
अस्वस्थ करेल जीवास तुझिया, पत्र लिही तू तेव्हा

नजरेसमोर नसेल जेव्हा रम्य लोभस काही
मेघांमागे दडे चांदवा, अधार नाही काही
एकाकीपण असेल केवळ, नसेल दुसरे काही
लोकही होतील जेव्हा परके, पत्र लिही तू तेव्हा

मूळ रचना : जफ़र गोरखपुरी
भावानुवाद : प्राजु

**************

जब मेरी याद सताए तो मुझे ख़त लिखना ।
तुम को जब नींद न आए तो मुझे ख़त लिखना ।।  

नीले पेड़ों की घनी छाँव में हँसता सावन,
प्यासी धरती में समाने को तरसता सावन,
रात भर छत पे लगातार बरसता सावन,
दिल में जब आग लगाए तो मुझे ख़त लिखना । 

जब फड़क उठे किसी शाख़ पे पत्ता कोई,
गुदगुदाए तुम्हें बीता हुआ लम्हा कोई,
जब मेरी याद का बेचैन सफ़ीना कोई,
जी को रह-रह के जलाए तो मुझे ख़त लिखना ।

जब निगाहों के लिये कोई नज़ारा न रहे,
चाँद छिप जाए गगन पर कोई सहारा न रहे,
लोग हो जाएँ पराए तो मुझे ख़त लिखना ।  
- जफ़र गोरखपुरी



Page copy protected against web site content infringement by Copyscape