सोमवार, ३० एप्रिल, २०१२

कशी माणसे तर्कट सारी

कशी माणसे तर्कट सारी
विचार, वाणी मळकट सारी

संस्कृतीच्या नावाखाली
बैल हाकती हेकट सारी

इतिहासाच्या पुण्ण्याईवर
उड्या मारती मर्कट सारी

शिवशाहीच्या नावाखाली
फ़साद करण्या दणकट सारी

दुसर्‍याचा तो कार्टा, म्हणती
अपुली पोरे नटखट सारी

किती तर्‍हेने टाळा यांना
मागे येती लोचट सारी

बोल शहाणे सांगू जाता
म्हणे वाटते कटकट सारी

खात कोंबडी ताव मारुन
वातड म्हणती.. हलकट सारी

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape