गुरुवार, २९ मार्च, २०१२

बंगाली बाबू संगीतकार आणि मी गीतकार... एक नवा मराठी अल्बम


बॉम्बे टीव्ही वर काम करणारा एक कलाकार.. पानू रे!
मदन मोहन आणि हेमंत मुखर्जी या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळालेले पानू रे... आणि त्यांचा सांगितीक वारसा मिळालेला त्यांचा मुलगा सुरोजीत रे...! या दोघा बाप-लेकांनी अनूप जलोटा यांच्यासोबत साई बाबांच्या भजनांचा एक अल्बम केला आणि बंगालीतूनही १-२ अल्बम केले होते . पण इतकी वर्ष मुंबईत राहिलेल्या या दोघांना मराठी संगितानेही तितकीच भुरळ घातली आणि मराठीतला पहिला वहिला अल्बम करण्याच्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचलले. कोणत्यातरी एका क्षणी सुरोजीतची आणि माझी भेट झाली फेसबुकवर आणि त्यांच्या या अल्बम साठी गाणी लिहिण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या चाली तयारच होत्या.. ९ चालींवर हळूहळू करत मी गाणी लिहिली . बंगाली असले आणि रोजच्या बोलण्यात फारशी मराठी येत नसली तरी सुरोजीतला मराठीची चांगली जाण आहे. कुठेही शब्दांची ओढाताण न होता गायकाला गायला सोपी जावी आणि तितकीच अर्थपूर्णही ... अशी गाणी त्याने माझ्याकडून लिहून घेतली. आणि बघता बघता ९ गाणी अरेंजमेंट होऊन आता ही ध्वनीमुद्रीका प्रकाशनाच्या मार्गावर आहे. अल्बम चं नाव आहे ........ 'ये प्रिये'.... गाणी त्या दोघांची!!
वैशाली सामंत आणि हृषिकेश रानडे यांनी या अल्बममधली गाणी गायली आहेत. बरीचशी शास्त्रीय आणि सुगम संगीत यांचा सुरेख संगम होऊन ही गाणी तयार झाली आहेत. काही गाण्यांच्या कमी लांबीच्या (Audio Clip) ध्वनीमुद्रिका खाली देत आहे..
ऐकून पहा.. कशी वाटताहेत सांगा..

दिसे चांद सोवळा.... हृषिकेश रानडे

चढलेली ही नशा.. वैशाली- हृषिकेश


पाकळ्या रुसल्या जरी.. हृषिकेश

जरा झोक्कात गीत .... वैशाली

गंध हलके हलके प्रमाणेच याही अल्बम ला तुम्हा सगळ्यांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा लाभूदेत.
- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape