शुक्रवार, ६ जानेवारी, २०१२

मदारी..

जिवाला फ़ुका वेदनांची उधारी
पुन्हा टोचणे भावनांचे जिव्हारी

किती सोसले घाव हृदयावरी मी
तुझी जीभ होती मुळातच कट्यारी

नसे धीर द्याया कुणी सोबतीला
बुळे शब्द झाले कधीचे फ़रारी

मनाला पहा डंख झाले हजारो
तुझी ही नजर हाय इतकी विषारी!

असे छाटले पंख माझे जगाने
पुन्हा घेतली ना कधी मी भरारी

न येतात मधुमास येथे अता की
जणू काय त्यांचीच येते शिसारी?

अशी वादळाच्या तडाख्यात फ़सले
कधी लागले ना कुणाच्या किनारी

गळा दोर काळा, मणी सोनियाचे
मला नाचवाया उभे हे मदारी

- प्राजु

1 प्रतिसाद:

Xcogitation म्हणाले...

mala google chrome varun post karata yet naahiye pratikriya....

mi kahi divas zale tumachya blog varachya kavita vachalya ...
mala tya avdalya...

mi atta dusaryanchya computer varun internet explorer vaparun pratikriya lihit aahe.

Neeraj
Philadelphia

Neeraj

Page copy protected against web site content infringement by Copyscape