सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११

माजं साजरं शिवार

उन्हाची गं लाही लाही
माय भेगाळली पार
काया ढेकळात सुन्न
माजं साजरं शिवार

जरा शिडकावा होता
जणू घेतंय उभार
उटण्याचा दरवळ
माजं साजरं शिवार

रान भिजलं भिजलं
पावसानं झालं गार
आता पुन्ना अंकुरेल
माजं साजरं शिवार

माज्या शिवारात उभं
पीक खेळकर फ़ार
कवतिक बघतंय
माजं साजरं शिवार

द्वाड वासरा परीस
कानी शिरलया वारं
डोल डोल डोलतंय
माजं साजरं शिवार

माजं साजरं शिवार
माज्या मनाचा आरसा
माजं साजरं शिवार
काळा आईचा वारसा..

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape