शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११

मज जन्म हवा 'जगण्या' दुसरा..

रडणे, रूसणे, सगळे विसरा
क्षण एक पुरे जगण्यास खरा

मन हे उतरे नयनांत पुन्हा
बघण्यास तुझा लटका नखरा

कुढण्यात हयात अशी सरली
मज जन्म हवा 'जगण्या' दुसरा

कविताच तुला बघता उमले
झरतोच मनी मग शब्द-झरा

जप सोनसळी तव कांति सखे
वळुनी बघती सगळ्या नजरा!!

हसले सगळे मज पाहुनिया
कळले मज मी बनले 'बकरा'

कसली तरही कसल्या गझला
जमला न मला असला मिसरा!

- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape