बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

लिखदी तेरे नाम साजणा, सारी जिंदगानी

मराठी कविता समुहावर 'लिहा प्रसंगावर गीत' या उपक्रमासाठी आयटम सॉंग लिहिण्याचा माझा प्रयत्न...

नाजूक कमर, तलवार नजर, मखमल ही ज्वानी
लिखदी तेरे नाम साजणा, सारी जिंदगानी

जाम भरावा प्याल्यामध्ये, किण किण व्हावी थोडी
चार बरफ़ के टुकडो के संग खिलती है ये जोडी
रात शबनमी टिपून घे ना भिजल्या ओठांनी
लिखदी तेरे नाम साजणा, सारी जिंदगानी

वक्ताचा तू ऐक इशारा, पळ भराचा खेळ सारा
बाहोंमे भरले मुझको, ना मिलेगा ये दोबारा
प्याल्यासोबत रंगूदे ही क्षणिक प्रेम कहाणी
लिखदी तेरे नाम साजणा, सारी जिंदगानी

जपून राजा डाव टाक तू, जहरी रात नशिली
एक तीर से बिखर न जाये तेरी जान रंगिली
मस्ती सारी आयुष्यावर फ़िरवून जाईल पाणी
लिखदी तेरे नाम साजणा, सारी जिंदगानी
- प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape