रविवार, १४ ऑगस्ट, २०११

दु:ख मी दावीत नाही ..

दु:ख मी दावीत नाही
(कारण)ही जगाची रीत नाही..!!

लग्न अन संसार केला
फ़क्त केली प्रीत नाही

ताल आहे, सूर आहे
का इथे संगीत नाही??

जन्म घेउन काय केले?
हे कुणा माहीत नाही

बांधले अंदाज नुसते
ते मुळी भाकीत नाही

स्वप्न आले लोचनी पण
स्पष्ट अन रंगीत नाही

शब्द ओठी विखुरलेले
बांधलेले गीत नाही

पाहुनी ते चंद्रतारे
जाहले मोहीत नाही

सांगते 'प्राजू' मनीचे
ती कुणाला भीत नाही
- प्राजु

1 प्रतिसाद:

Meenal Gadre. म्हणाले...

"प्राजु कुणाला भित नाही "
काय सांगतेस? खरंच?

Page copy protected against web site content infringement by Copyscape