रविवार, १० जुलै, २०११

खोल खोल आतवर तुझी नजर..

जीवनात फ़ुलविते नवा बहर
खोल खोल आतवर तुझी नजर

मी नशेत राहतो असा सदा!
नयन की तुझे प्रिये असे जहर?

'बिलगशी कितीक रे तिला असा!!
पावसा!! पुरे अता तुझा कहर!!'

का मिठीत येत लाजतेस तू??
का हळूच कंप पावती अधर??

लाजताच तू अशी पुन्हा पुन्हा
अंतरात खोल का उठे लहर

मी कितीक दूर चाललो जरी
भेटते तुझेच नाव अन शहर

साथ दे मला तुझी अशी सखे
मिसळुदे मला तुझ्या स्वरांत स्वर

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape