प्राणमोक्ष..
पंढरीची वाट, चालती वैष्णव,
नादावला जीव, नाम घेता ||
चंद्रभागा सांगे, 'ज्ञाना'ची कहाणी,
मुक्ताईची वाणी, खळाळत ||
सावळ्याच्या चरणी, घालतो जोहार,
देवळा बाहेर , चोखा उभा ||
भास नि आभास, तुझे ठायी ठायी ,
विश्वामध्ये बाई, विठू नांदे ||
मुखी तुझे नाम, घ्यावे रात-दिन,
कठीण जीवन , व्हावे सोपे||
माझिया अंतरी, सावळ्याचे मुख,
दुजे नाही सुख, जीवनात ||
माझे पाप देवा, घेई पदरात
देई मरणात, प्राणमोक्ष ||
- प्राजू
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा