बुधवार, १३ जुलै, २०११

कलाकार ..

प्रेमगीतांच्या कळ्या ज्या तुझ्याचसाठी वेचल्या
आज बाजारी विकाया मीच सार्‍या मांडल्या

ज्या गीतांवर प्रीत तुझी गं विसावलेली
लिलावात या लागेल आता त्यांची बोली
भाव-भावना अन जाणिवा, शब्द आणि ओळी
चंदेरीशा तराजूत त्या तोलण्याला सांडल्या..

मनस्वीतेतुन तुला लेखिले, ज्या गीतांनी
'केवळ वस्तू' केले त्यांना गरिब हातांनी
मिळेल तुझिया लावण्याच्या कथा मधुनी
वस्त्र -निवार्‍याच्याच इच्छा मनात माझ्या दाटल्या

जगण्याच्या या सत्वपरिक्षेमध्ये पहा ना
साथ देईना माझी कविता माझ्या रचना
तोरा तुझा श्रीमंताची ठेव मी हे जाणतो ना
तुझ्या चित्रप्रतीही माझ्यासवे कधी ना राहिल्या

प्रेमगीतांच्या कळ्या ज्या तुझ्याचसाठी वेचल्या
आज बाजारी विकाया मीच सार्‍या मांडल्या
स्वैर भावानुवाद : प्राजू
------
मैंने जो गीत तेरे प्यार की खातीर लिखे
आज उन गीतों को बाज़ार में ले आया हूँ...

आज दुकान पे नीलाम उठेगा उनका,
तूने जिन गीतों पर रख्खी थी मोहब्बत की असास...
आज चांदी की तराज़ू में तुलेगी हर चीज़,
मेरे अफ़कार, मेरी शायरी, मेरा एहसास...

जो तेरी ज़ात से मनसूब थे, उन गीतों को
मुफ़्लिसी, जिन्स बनाने पर उतर आई है...
भूक, तेरे रूख-ए-रंगीं के फ़सानों के इवज़
चंद आशीया-ए-ज़रूरत की तमन्नाई है...

देख इस अरसागह-ए-मेहनत-ओ-सरमाया में
मेरे नग़्में भी मेरे साथ नहीं रह सकते...
तेरे जल्वे किसी ज़रदार की मीरास सही,
तेरे खाके भी मेरे पास नहीं रह सकते...

आज उन गीतों को बाज़ार में ले आया हूँ
मैंने जो गीत तेरे प्यार की खातीर लिखे...
मूळ रचना : फ़नकार
रचनाकार : साहिर लुधियानवी

Page copy protected against web site content infringement by Copyscape