भोगणे आयुष्य मी टाळू कशाला?
भोगणे आयुष्य मी टाळू कशाला?
भीड या दुनियेत सांभाळू कशाला?
मीच ठरवावी दिशा माझ्या शिडाची
जाच वार्याचा उगा पाळू कशाला?
काय झाली एवढीशी चूक माझी!!
त्यात हे आयुष्य मी जाळू कशाला?
जाण आहे 'रूप माझे देखणे की'
आरश्या रे ! मी तुला भाळू कशाला?
गावले मज शिंपले मोत्यासवे तर
व्यर्थ मी रेती आता चाळू कशाला?
ग्रीष्म आला! येउ दे ना, काय त्याचे!
त्यामुळे मीही उगा वाळू कशाला?
बोलते 'प्राजू' "करू संघर्ष आता
आत्मविश्वासास मी ढाळू कशाला??
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा