माझ्या असण्याची मी लोका साक्ष पटवत होते
माझ्या असण्याची मी लोका साक्ष पटवत होते
घेऊन मूठभर राख ती मी तशीच उधळत होते
'नको' म्हणूनी पुसले ज्यांना आयुष्यातून मी
तीच आठवे आज माझे जीवन फ़ुलवत होते
मैफ़िल त्याची, तोच राजा, त्याचे सगळे खरे
मीही मुक्याने तेथे केवळ हुंकार भरत होते
कीव करती पाहून मजला माझे वडीलधारे
कधी काळी 'सुखी भव' ते मजला म्हणत होते
हत्यारे ते बरे म्हणावे ,मज आधी भेटले जे
ठार करण्याआधी पाणी देऊन शमवत होते
लाखोली तो वहात होता मजला येता जाता
नि मी कवितेमधुनी त्याला उगाच अळवत होते!
काय बांधू, कसे बांधू वेड्या मनाचे घरटे?
उभारलेल्या भिंती जर का मीच पाडत होते!
असत्याचीच मीही आता कास धरावी वाटे
लोक सत्यालाच सुळावर आता चढवत होते
- (भावानुवाद)प्राजु
मूळ रचना : राहत इंदौरी
अपने होने का हम इस तरह पता देते थे
खाक मुट्ठी में उठाते थे, उड़ा देते थे
बेसमर जान के हम काट चुके हैं जिनको
याद आते हैं के बेचारे हवा देते थे
उसकी महफ़िल में वही सच था वो जो कुछ भी कहे
हम भी गूंगों की तरह हाथ उठा देते थे
अब मेरे हाल पे शर्मिंदा हुये हैं वो बुजुर्ग
जो मुझे फूलने-फलने की दुआ देते थे
अब से पहले के जो क़ातिल थे बहुत अच्छे थे
कत्ल से पहले वो पानी तो पिला देते थे
वो हमें कोसता रहता था जमाने भर में
और हम अपना कोई शेर सुना देते थे
घर की तामीर में हम बरसों रहे हैं पागल
रोज दीवार उठाते थे, गिरा देते थे
हम भी अब झूठ की पेशानी को बोसा देंगे
तुम भी सच बोलने वालों के सज़ा देते थे..
- राहत इंदौर
1 प्रतिसाद:
छान !
टिप्पणी पोस्ट करा