शुक्रवार, १३ मे, २०११

भेटली जी मला..

भेटली जी मला सहन केली
माणसे व्यर्थ मी जतन केली

गाडलेली कधी जुनी दु:खे
का उगा मीहि उत्खनन केली??

काळजाला जरा तडा गेला
वेदना मीच आचमन केली

अर्थ ना लागला कशाचाही
मी कितीदा कथा कथन केली!!

जाहली का भकास ही वास्तू??
का तिला मी कधी दहन केली??

ठेवलेली जपून हृदयाशी
तीच आशा कुणी हनन केली??

'प्राजु' आता अशी नको थांबू
गझल चर्चा तुही गहन केली!
- प्राजु

2 प्रतिसाद:

Ganesh Bhute म्हणाले...

छान !

Arvind Chaudhari म्हणाले...

किती सुंदर लिहिलीस ग़ज़ल प्राजू...!
''लज्जिता'' वृत्तात...

सुंदर मतला ,सुंदर मक्ता...
अहाहा !

Page copy protected against web site content infringement by Copyscape