ओठास लावूनी जरा मी वेदनेला, बोलले
बोलावितो आता पुन्हा का पाखरांचा हा थवा ?
का जोडते संबंध त्या वेड्या नभाशी मी नवा?
ओठास लावूनी जरा मी वेदनेला, बोलले
’चाखून पाहू दे सुखाचा मज जरासा गोडवा!"
आकाश् दिसते लांब इतुके पंख माझे तोकडे
’गरुडापरी घेईन पण मी झेप!’- म्हणतो पारवा
शब्दातुनी मी काळजाचे वेचले तुकडे असे
माझी व्यथा त्या मैफ़िलित मिळवून गेली वाहवा!
वाटेवरी स्मरते पुन्हा त्याचीच कविता पण तरी
त्याच्या विना गाऊ कशी, कोठून आणू सुर नवा??
आहे निघाली भावनांची प्रेतयात्रा या इथे
मुर्दाड व्हा आता मनाने... ढोलताशे वाजवा!!
’प्राजू’ तुला कळलाच् कोठे ढंग दुनियेचा खरा!
दुनियेत,... वेडे,.. भोवती साधेपणाची वानवा!!
- प्राजु
-------------------------------------------------------
राधा तुझी, गोपी तुझ्या, वेडीपिशी मथुरा तुझी
’कुब्जा’च् ना झाली कधी तव् प्रीय् सखी रे केशवा
2 प्रतिसाद:
शब्दातुनी मी काळजाचे वेचले तुकडे असे
माझी व्यथा त्या मैफ़िलित मिळवून गेली वाहवा!
सुंदर !
बोलावितो आता पुन्हा का पाखरांचा हा थवा ?
का जोडते संबंध त्या वेड्या नभाशी मी नवा?
ओठास लावूनी जरा मी वेदनेला, बोलले
’चाखून पाहू दे सुखाचा मज जरासा गोडवा!"
आकाश् दिसते लांब इतुके पंख माझे तोकडे
’गरुडापरी घेईन पण मी झेप!’- म्हणतो पारवा
---khup sundar sher aahet
---mast gazal Praju...
टिप्पणी पोस्ट करा