शुक्रवार, १३ मे, २०११

तुझे भास होते..

निळ्या त्या जळी चांदणे खास होते
मला सांग ते सत्य की भास होते?
जिथे या मनाला विसावा मिळाला
दिवास्वप्न की ते तुझे भास होते??

वसंती कळ्यांना तुझी आस होती
तुझ्या अमृताची जणू प्यास होती
कळ्यांना हळूवार फ़ुलवून गेले
तुझे स्पर्श की ते तुझे भास होते?

उन्हाला जरा पावसाचा इशारा
फ़ुलूदे जरा सप्तरंगी नजारा
बहरले नव्याने कमानी मध्ये त्या
तुझे रंग की ते तुझे भास होते..

नवे सूर झरती तुझ्या लोचनातुन
नवे स्वप्न वाहे तुझ्या पापण्यातुन
मनी आज झंकारले सांग आता
तुझे गीत की ते तुझे भास होते..

हळू बोलसी तूच सौधात माझ्या
भिजूदे तुझे श्वास श्वासात माझ्या
दिसे जे मला पाहता दर्पणी त्या
तुझे बिंब की ते तुझे भास होते

- प्राजु

1 प्रतिसाद:

Ganesh Bhute म्हणाले...

निळ्या त्या जळी चांदणे खास होते
मला सांग ते सत्य की भास होते?
जिथे या मनाला विसावा मिळाला
दिवास्वप्न की ते तुझे भास होते??

वसंती कळ्यांना तुझी आस होती
तुझ्या अमृताची जणू प्यास होती
कळ्यांना हळूवार फ़ुलवून गेले
तुझे स्पर्श की ते तुझे भास होते?

खूप सुंदर !

Page copy protected against web site content infringement by Copyscape