येई मल्हार भोवळ
झाला नभात गोंधळ
आले भरून आभाळ
सार्या रानाला हिरवी
येई मल्हार भोवळ
वीज कोरते आभाळ
तिचे नर्तन वेल्हाळ
आण थेंबाला सरींची
सजे तरंगात जळ
झाली पावसाची वेळ
मेघ सोसुनिया कळ
जन्म घेती जलधारा
झाला कोसळ कोसळ
गर्द हिरवासा माळ
आणि वारा सळसळ
घेत कवेत तृणांना
जणू नाचती ओहोळ
लागे डोंगराला खूळ
शुभ्र कापसाची धूळ
काळ्या हिरव्या रूपात
लाजे उभ्याने बाभूळ
असा श्रावणाचा खेळ
उन हळदी कोवळ
घेत लकेर रंगीत
पुन्हा होईल ढगाळ!
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा