पाऊस भरून आला..
निश:ब्द नभाचे गीत,समरसून गाते वीज
लंघून सावळी वेस, म्हणे 'भीज आता तू भीज"
नको नको म्हणताना
पाऊस भरून आला
गात्रात चिंब अवघ्या
अव्यक्त भार ओला
न्यास जणू थेंबांचा
पैंजणी झंकार येतो
भिजल्या यौवनाचा
भिजला हुंकार येतो
चाहूल नभाची येते
मेघांनी ओथंबलेली
श्वासात मृदगंधाची
थरथर दरवळलेली
पाऊस बिलगला ऐसा, अस्तित्व नुरले काही
अन सोहळा सरींचा, गात्रांत भरून वाही
-प्राजु
1 प्रतिसाद:
न्यास जणू थेंबांचा
पैंजणी झंकार येतो
भिजल्या यौवनाचा
भिजला हुंकार येतो
चाहूल नभाची येते
मेघांनी ओथंबलेली
श्वासात मृदगंधाची
थरथर दरवळलेली
सही !
टिप्पणी पोस्ट करा