कविता माझी ..!
घुमून येत रंगली ती अशी मनावरी
शब्द साज लेऊनी बरसली सरीपरी
कुशीत घेतले तिने खोल मजला असे
उमटले मनावरी हळूवार शब्दठसे
बहरले शब्द अन एक माळ गुंफ़ली
घेत वळणे मनी कविता मग दंगली
चिंब जाहल्याच शब्दपाकळ्या सभोवती
फ़ुलांवरी विसावल्या रूपेरी त्या लडी किती!
नव्या शब्द पालवीस न्हाऊ माखू घातले
खुलून येत रूप पोपटी उगाच हासले
गोंदले मनावरी शब्द चांदणे तिने
सृजन अवतरे जणू घेत रूप देखणे
- प्राजु
1 प्रतिसाद:
गोंदले मनावरी शब्द चांदणे तिने
सृजन अवतरे जणू घेत रूप देखणे
खास !
टिप्पणी पोस्ट करा