जाळीत जाती शब्द ऐसे की हृदयही पेटते..
क्रांतीच्या गझलेतील 'हास्यातले सुकती झरे, ओठीच गंगा आटते..' ही ओळ घेऊन लिहिलेली गझल..
हास्यातले सुकती झरे, ओठीच गंगा आटते
जाळीत जाती शब्द ऐसे की हृदयही पेटते
नातेच माझे तोकडे जे विरते इथे तीथे अता
ओढून मी घेऊ किती, ते ओढले की फ़ाटते
का दोष हा त्या संचिताचा, खेळ माझा मोडला?
की दैव ही आयुष्य माझे फ़क्त आता रेटते?
काही असे येते भरूनी जीव होतो घाबरा
अन वेदना केव्हा कधीची काजळावर दाटते
काळोख होता दीप लावुन मी प्रकाशीते घरा
पण का कशाचे अन कुणाचे भय मनाला वाटते
झाल्या चुकांचा मांडती बाजार माझे सोयरे
जाईन तेथे मीच गतकालास माझ्या भेटते
-प्राजु
1 प्रतिसाद:
काळोख होता दीप लावुन मी प्रकाशीते घरा
पण का कशाचे अन कुणाचे भय मनाला वाटते
सुंदर !
टिप्पणी पोस्ट करा