मंगळवार, २२ मार्च, २०११

फ़ुलू दे इच्छा-आकांक्षांना

अबलख घोडे स्वैर धावती
अंतरात या मोहळ उठले
वादळाचे त्या पडघम की हे
मनास वेड्या हेच ना कळे

गडद होई मळभ तरीही
पाऊस का हा बरसत नाही
आसमंतही कोंदटलेला
प्रकाशरेषा नसे जराही..

बरसून जा रे आतून आता
दाटून आली व्यथा निळी
नकोस अडवू आवेगाला
लख्ख दिसू दे दिशा जांभळी

जरा हसू दे जरा फ़ुलू दे
उन्हांत ओल्या दहा दिशांना
बरसून जा तू आता ऐक ना
फ़ुलू दे इच्छा-आकांक्षांना

- प्राजु

1 प्रतिसाद:

Ganesh Bhute म्हणाले...

जरा हसू दे जरा फ़ुलू दे
उन्हांत ओल्या दहा दिशांना
- खूपच सुंदर !

Page copy protected against web site content infringement by Copyscape