पुन्हा आठवांची कवाडे उघडली!!!
जशी आठवांची कवाडे उघडली
तशी शांतता मूक शब्दांत रडली..
कधी गूढ ना त्या किनार्या समजले
कुणाची कवीता जळी खोल दडली
मनी सावळे काय दाटून आले..
तशी स्पंदनांची उगा लय बिघडली!!
कधी काय झाले कुणाला न समजे
अशी जीवनाची कशी वाट घडली!!
जरासेच हलते कधी आत काही
तरंगून जाते उरी आस दडली..
जसे पाहिले आत डोकावुनीया
व्यथेशीच माझ्या तिथे गाठ पडली
बुडाला जसा श्वास काळोख होता
पुन्हा आठवांची कवाडे उघडली!!!
- प्राजु
2 प्रतिसाद:
- खुप सुंदर !
मनी सावळे काय दाटून आले..
तशी स्पंदनांची उगा लय बिघडली!!
ह्या ओळी खूप खुप आवडल्या...
मनाची एक हळवी अवस्था कित्ती सुंदर आणि समर्पक शब्दात व्यक्त होते आहे ! सुरेख !
Sundar ! - vishesh karun -
बुडाला जसा श्वास काळोख होता
पुन्हा आठवांची कवाडे उघडली!!!
mastach
टिप्पणी पोस्ट करा