मन व्याकुळ व्याकुळ..
मन व्याकुळ व्याकुळ,जशी सागराची लाट
उसळते पुन्हा पुन्हा, भिजे रेतीचा गं काठ
मन स्वातीचा गं थेंब, शिंपलीत मिटलेला
अंजारूनी गोंजारूनी, मोत्यापरी नटलेला
मन होई थरथर, जसे वादळात शीड
घाव झेलता झेलता, जगण्याची धडपड
मन बावरे बावरे, सरे पायाखाली रेती
शोधी आधार कुणाचा, वाहण्याची उगा भिती
मन नदीचा प्रवाह, वळणे ही नागमोडी
खारवल्या सागराला, भेटण्यात वाटे गोडी
मन भिजलेले दव, रेतीवर पहुडले
तेजाच्या त्या एक स्पर्शी, अलवार झिरपले
- प्राजु
2 प्रतिसाद:
Hello Prajakta,
Asach surfing karta karta tumcha blog disla. Khup ch chhan lihita tumhi. Ata regularly ya blog la visit det jaen mi.
Shailaja Bhope Gokhale
मन भिजलेले दव, रेतीवर पहुडले
तेजाच्या त्या एक स्पर्शी, अलवार झिरपले
अप्रतिम, खास !
टिप्पणी पोस्ट करा