फ़ुलण्याचा हव्यास तुला!!
दुलई सारत गर्द धुक्याची
वसंत म्हणतो 'हास!!' तुला..!
खुदकन हसूनी हळूच पाहसी
फ़ुलण्याचा हव्यास तुला!!
सुर्याची त्या बाळे अवखळ
खेळवण्याला खास तुला
दवात न्हाऊन रूप पाहसी
नटण्याचा हव्यास तुला!!
एक पाकळी पसरून पल्लव
गंधविभोरी आस तुला..
वार्यासंगे हिंदोळ्यावर
झुलण्याचा हव्यास तुला!!
तुला पाहण्या सारे आतूर
तारूण्याचा ध्यास तुला..
भ्रमर छेडतो तार मनाची
भुलण्याचा हव्यास तुला!!
"नवलाई त्या नव्या फ़ुलाची
सारी सृष्टी भरात होती
उत्सव होता नवरंगांचा
तारूण्याची वरात होती.."
- प्राजु
3 प्रतिसाद:
kya bat ... Sahi
kya bat ... mast
नवलाई त्या नव्या फ़ुलाची
सारी सृष्टी भरात होती
उत्सव होता नवरंगांचा
तारूण्याची वरात होती.."
खूप सुंदर !
टिप्पणी पोस्ट करा