नको मागु तू आसवांनाच ग्वाही
नको मागु तू आसवांनाच ग्वाही
दिले अंतरीचे तुला सर्व काही
उगा पाहसी तू फ़िरूनी कितीदा!!
तिचे भास नुसते, नसे और काही
मला आस होती तुझ्या अमृताची
पिऊदे अता हे कडू घोट काही
बघू दे मला सोहळे हे सरींचे
न जाणो पुन्हा मेघ भरणार नाही!!
उभा जन्म गेला तुझी वाट बघण्या
न आलीस तू, मी न आलो तसाही!!
जरी ऐकू येतो इशारा क्षणांचा
वळूनी पहाणे अता शक्य नाही
असे श्वास जाती पुन्हा अंतराळी
जसा देह माझा कि जगणार नाही..!
- प्राजु
1 प्रतिसाद:
बघू दे मला सोहळे हे सरींचे
न जाणो पुन्हा मेघ भरणार नाही!!
जरी ऐकू येतो इशारा क्षणांचा
वळूनी पहाणे अता शक्य नाही
व्वा व्वा खूप सुंदर ...
टिप्पणी पोस्ट करा