दु:ख आता फ़ार झाले..
हासणे दुश्वार झाले
दु:ख आता फ़ार झाले
पाहुनी त्यांची मुजोरी
शब्दही तलवार झाले
तोकडे नातेच उरले
फ़क्त शिष्टाचार झाले
फ़ाटके प्रारब्ध होते
दैवही लाचार झाले
रीत दुनियेची जुनी पण
मी नवीन शिकार झाले
लंघुनी बंदिस्त भिंती
पार गुन्हेगार झाले
शब्द होते लाघवी पण
का अता बेकार झाले??
जख्म का ही भळभळेना??
वार ही अलवार झाले!!
- प्राजु
1 प्रतिसाद:
डेंजरस कविता!
एकदम वॅलेंटाईन डेलाच?
आवडली.
टिप्पणी पोस्ट करा