माळुनी प्रीत ही गंध श्वासात दे..
माळुनी प्रीत ही गंध श्वासात दे
चांदण्याचा तुझा हात हातात दे
वैजयंती परी अंगणी तू उभी
सादगीची तुझ्या आज सौगात दे
सांज आतूरली भेटण्याला तुला
रक्तिमा ओठिचा सांज रंगात दे
साठुदे प्रीत ही अंतरी आपुली
'ठेव' ही आगळी मर्मबंधात दे
जन्म घेऊनिया वाहिला मी तुला
जाणिवा नेणिवा या प्रपंचात दे
मागतो जीवनी श्रावणाच्या सरी
ऊन-पाऊस तू आसमंतात दे
रंगते का कुठे रास राधेविना??
"माधवा, एकदा साद तू आर्त दे.."
- प्राजु
वैजयंती - तुळस
गालगा, गालगा, गालगा, गालगा
1 प्रतिसाद:
माळुनी प्रीत ही गंध श्वासात दे
चांदण्याचा तुझा हात हातात दे
कित्ती छान ! मन भाळलय माझं ह्या ओळींवर ....
खूप आवडली...
टिप्पणी पोस्ट करा