कुणी द्या जरासा मनाला उतारा..
मना लाभेना का कुठेही निवारा
विचारात घुमतोय बेभान वारा
भली काव्य वचने लिहाया जराशी
जरा कागदाचा मिळूदे सहारा..
नको नाव आणी नको गाव आता
उभारू नको तू पुन्हा हा पसारा
जरा लेखणीला विसावाच द्यावा
नको शब्द आणी नको तो शहारा
जराशी फ़िरूदे दिशा वादळाची
जरा होडिला लाभुदे रे किनारा!!
न भिजती अताशा कडा पापण्यांच्या
जणू गोठला भावनांचाच पारा
न कल्लोळ थांबे , न विश्रांत होई
कुणी द्या जरासा मनाला उतारा..
- प्राजु
1 प्रतिसाद:
मनाच्या एका वेगळ्या, अधिकच हळव्या अवस्थेचे खूप सुंदर वर्णन !
टिप्पणी पोस्ट करा